Home Agri Trends ‘आदर्श शेतकरी’ पुरस्काराने 15 शेतकरी सन्मानित

‘आदर्श शेतकरी’ पुरस्काराने 15 शेतकरी सन्मानित


WhatsApp Image 2019 02 27 at 2.48.37 PM

जळगाव (प्रतिनिधी) । जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे जिल्ह्यातील 15 शेतकर्‍यांना आदर्श शेतकरी पुरस्कारचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात आज बुधवारी सकाळी 11 वाजता झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील होत्या. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्याहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन. पाटील, महिला बालकल्याण समितीच्या सभापती रजनी चव्हाण, आरोग्य सभापती दिलीप पाटील, समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, जि.प.सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे, जि.प.सदस्य पवन सोनवणे यांची उपस्थिती होती.

या शेतकर्‍यांना मिळाला ‘आदर्श शेतकरी पुरस्कार’
मान्यवरांच्या उपस्थितीसह निवड झालेल्या शेतकरी सपत्नीक उपस्थित होते. यावेळी जि.प.सदस्य उज्ज्वला पाटील यांच्याहस्ते ‘आदर्श शेतकरी’ पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यात गोविंदा धनजी महाजन ( उत्राण ता. एरंडोल), ईश्वर भीमराव पाटील (बांभोरी बु. ता. धरणगाव), विकास श्रावण चौधरी (दसनूर ता. रावेर), अतुल चंद्रशेखर बढे (रुईखेडा, ता. मुक्ताईनगर), उत्तम नामदेव माळी (पातोंडा, ता. चाळीसगाव), योगेश भागवत पाटील (बात्सर ता. भडगाव), राजेंद्र काशिनाथ चौधरी (पिलखेडा, जळगाव), रमेश दामू भारंबे (साकरी, भुसावळ), अविनाश बाबुराव पाटील (सामरोद, ता. जामनेर), नरहर दामू राणे ( कोल्हाडी, ता. बोदवड), डॉ. चंद्रकांत गोकुळ पाटील (खरग, ता. चोपडा), अतुल लिलाधर पाटील (चितोडा, ता.यावल) यांचा समावेश आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound