केळी व्यापाऱ्यांकडून १५ शेतकऱ्यांची ३५ लाख २४ हजारात फसवणूक; दोन जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील केळी उत्पादक १५ शेतकऱ्यांकडून केळीचा माल घेवून सुमारे ३५ लाख २४ हजार ७२४ रूपयांची फसवणूक केल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दोन व्यापाऱ्यांवर बुधवार ४ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अशोक रघुनाथ पाटील रा. निंभोरा ता. रावेर आणि महेंद्र सिताराम निकम रा. जारगाव ता. पाचोरा असे फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांची नावे आहे. सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील सुधीर मधुकर चौधरी रा. पिलखेडा ता. जि.जळगाव हे शेतकरी करून केळीचे उत्पादन घेवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. १७ आणि २३ फेब्रुवारी २०१९ रोजी केळी व्यापारी अशोक पाटील आणि महेंद्र निकम हे गावात येवून २ लाख ७० हजार १५६ रूपये किंमतीचा कच्चे केळीचे तयार माल दोघांना दिला. परंतू वारंवार तगादा लावूनही दोन्ही व्यापाऱ्यांनी सुधीर चौधरी याचे पैसे २ लाख ७० हजार १५६ रूपये दिली नाही. त्याचप्रमाणे चौधरी यांच्यासह तालुक्यातील इतर १४ शेतकऱ्यांकडून देखील वेळोवेळी त्यांच्या शेतातून केळीचा तयार कच्चा माल घेवून दोघांनी फसवणूक करून अद्याप पैसे दिलेले नाही. 

यात प्रमोद हरी पवार रा. नंदगाव ता. जि.जळगाव यांचे ३ लाख ७२ हजार २२०, योगराज नामदेव सपकाळे रा. फुफनी ता.जि.जळगाव यांचे ३ लाख १ हजार ७३८, विजय रामकृष्ण सपकाळे रा. फुफनी ता. जि.जळगाव यांचे २ लाख ५० हजार ६०, रतिलाल माणिक पवार रा. भोकर ता.जि.जळगाव ३ लाख ९२ हजार ११३, रत्नाकर शिवलाल सोनवणे रा. देवगाव ता.जि.जळगाव यांचे १ लाख ३० हजार ५०५ रूपये, अनिल बाबुराव चौधरी रा. पिलखेडा ता.जि.जळगाव यांचे १ लाख २३ हजार ४२८ रूपये, मोहनचंद नारायण सोनवणे रा. करंज यांचे २ लाख ६५ हजार ९४९, संजय रावण पाटील रा. भोकर ता.जि.जळगाव १ लाख ४७ हजार ६९६, मोहन एकनाथ सोनवणे रा. फुफनी ता.जि.जळगाव यांचे १ लाख ३४ हजार ६३५ रूपये, शिवाजी पुरमल पाटील रा. नंदगाव ता.जि.जळगाव यांचे १ लाख ३९ हजार १५६ रूपये, मश्चिद्र झावरू कोळी रा. धानोरा ता.जि.जळगाव यांचे  २ लाख ५८ हजार ९७६ रूपये, झेंडू महारू कोळी रा. धार्डी ता. जि.जळगाव यांचे २ लाख ३९ हजार ९०६ रूपये, किशोर देवाजी सोनवणे रा. गाढोदा आणि शिवदास भगवान चौधरी रा. पिलखेडा ता. जि.जळगाव यांचे २ लाख ३४ हजार ६५३ रूपये असे सर्व मिळून एकुण ३५ लाख २४ हजार ७२४ रूपयांची फसवणूक केल्याचे उघडकीला आले. वरील १५ शेतकऱ्यांचा गेल्या दोन वर्षांपासून फोनद्वारे पैश्याचा तगादा लावला परंतू अद्यापपर्यंत दोन्ही संशयित आरोपी अशोक रघुनाथ पाटील रा. निंभोरा ता. रावेर आणि महेंद्र सिताराम निकम रा. जारगाव ता. पाचोरा यांनी एकही रूपये शेतकऱ्यांना दिलेला नाही. यासाठी २० फेब्रुवारी २०२१ रोजी सर्व शेतकरी दोघांच्या घरी गेले असता दोन्ही व्यापाऱ्यांनी माल देण्यास नकार दिला. तसेच तुमच्याकडून जे होईल ते करून घेण्याची धमकी दिली. दरम्यान केळीचा माल घेवून दोन्ही व्यापाऱ्यांनी फसवणूक केल्याचे समजले. सुधीर चौधरी हे इतर १४ शेतकऱ्यांना घेवून तालुका पोलीस ठाण्यात दोन्ही व्यापाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आज बुधवार ४ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content