बाडमेर वृत्तसंस्था । येथे आज एक धार्मीक कार्यक्रम सुरू असतांना वादळी वार्यामुळे मंडप कोसळून १४ जण ठार झाले असून २० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.
या धक्कादायक घटनेचा तपशील असा की, बाडमेर शहराजवळच्या जसोल या गावात रामकथेचे आयोजन करण्यात आले असून यात हजारो भाविक सहभागी होत असल्याने मोठा मंडप टाकण्यात आला होता. रविवारी दुपारी या भागात वादळी पाऊस आल्यामुळे मंडप कोसळला. यासोबत इलेक्ट्रीकचे शॉर्ट सर्कीटदेखील झाले. यामुळे येथे १४ भाविकांचा मृत्यू झाला असून २० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.