कोलकाता । भरधाव वेगाने धावणार्या डंपरने विविध वाहनांना दिलेल्या धडकेत १३ जण ठार झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भिती आहे.
पश्चिम बंगालमधील जलपाईगुडीच्या नजीक असणार्या धुपगुडी भागात आज पहाटे भीषण अपघात घाला. धुपगुडीहून एक डंपर नदीचे दगड घेऊन जात असतांना या डंपरने समोरून येणार्या वाहनांना जोरदार धडक दिली. यात वाहनांचा चेंदामेंदा झाला आणि १३ जणांचा यामध्ये जागीच मृत्यू झाला. यामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
या अपघातात जखमी झालेल्या लोकांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले असून पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.