पहूर ग्रामीण रुग्णालयात १३ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया

पहूर, ता.जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पहूर ग्रामीण रुग्णालयात १३ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या असल्याची माहिती डॉ. संदिप कुमावत यांनी दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय पहुर येथे डॉ. प्रशांत महाजन यांनी १३ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या असल्याचे डॉ. कुमावत यांनी सांगितले.

यावेळी ग्रामीण रुग्णालय पहूर येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षल चांदा, प्राथमिक आरोग्य केंद्र वाकोद येथील डॉ. संदीप कुमावत, डॉ. राजाराम देशमुख, डॉ. मयुरी पाटील आदींनी सहकार्य केले. तसेच शिबिरामध्ये ग्रामीण रुग्णालय पहूर येथील पूर्ण स्टाफ व आशा वर्कर यांचे सहकार्य लाभले.

Protected Content