Home Cities रावेर विवरे येथे विषबाधेने १२ मेंढया मृत्युमुखी

विवरे येथे विषबाधेने १२ मेंढया मृत्युमुखी

170032a7 6f71 44cc bdb9 1e541f1d9f7a
170032a7 6f71 44cc bdb9 1e541f1d9f7a

170032a7 6f71 44cc bdb9 1e541f1d9f7a

रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील विवरे येथे शिळ्या पोळ्या खाल्याने विषबाधा होवून १२ मेंढया मृत झाल्याची घटना आज (दि.५) दुपारी घडली असुन आणखी ३० मेंढयांवर पशु वैद्यकीय अधिकारी उपचार करीत आहेत.

 

या बाबत वृत्त असे की, हिरामन चिंधा कोळपे हा आपल्या मेंढयाचा कळप चराईसाठी घेऊन गेला असता विवरे शिवारात चरत असतांना शिळ्या पोळ्या त्यांच्या खाण्यात आल्यामुळे सुमारे ४० मेंढयांना विषबाधा झाली. या प्रकाराची माहिती धनगर समाजाचे नेते संदीप सावळे यांना मिळताच ते भाजपा पदाधिकारी हरलाल कोळी यांना घेऊन घटनास्थळी आले व त्यांनी तात्काळ डॉ. सजंय धांडे, डॉ. प्रवीण धांडे, डॉ. निलेश राजपूत व लक्ष्मण चौधरी यांना बोलवून विषबाधा झालेल्या मेंढयांवर उपचार केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound