शारीरिक शिक्षकांचे शिर्डीत महाअधिवेशन जिल्ह्यातून शंभर शिक्षकांचा सहभाग

 

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील शारीरिक शिक्षकांचे अधिवेशन शिर्डीच्या साई संस्थानमध्ये शुक्रवारी संपन्न झाले. राज्यातून चार हजार शिक्षकांनी यावेळी हजेरी लावली तर जिल्ह्यातूनही सुमारे १०० शिक्षक उपस्थित होते.

पहिल्या राज्यस्तरीय शारीरिक शिक्षक महाअधिवेशनाचा शुभारंभ साईनगरीत काल डॉक्टर सौ. संध्या जिंतुरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण व दीप प्रज्वलित करून करण्यात आला. यावेळी शारीरिक शिक्षण आयोजन समितीचे अध्यक्ष राजेंद्र खोतकर, निमंत्रक विश्वनाथ पाटोळे, कार्याध्यक्ष ज्ञानेश काळे, सचिव संजय पाटील, निलेश इंगळे, महेंद्र हिंगे, आप्पासाहेब शिंदे, सुनील राजेंद्र पवार, राजेंद्र कोकडे, गणेश मस्के, राजेंद्र बनसोडे, आनंद पवार, मयूर ठाकूर, राजेंद्र जगदाळे, आवारी सर सर्व विभागाचे विभाग प्रमुख व क्रीडा शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.

शारीरिक शिक्षक अधिवेशनामध्ये शारीरिक शिक्षकांच्या समस्यांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. शासनाच्या काही जाचक अटींवरही मार्गदर्शन करून शारीरिक शिक्षकांना योग्य दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील असे अधिवेशनामध्ये सांगण्यात आले. आज ह्या अधिवेशनाचा दुसरा दिवस असून शारीरिक शिक्षकांचा उपस्थितीचा आकडा पाच हजार जाण्याची शक्यता आहे, असे शारीरिक शिक्षक मिलींद पाटील यांनी म्हटले आहे.

Add Comment

Protected Content