विदगाव येथील वारके विद्यालयाचा निकाल १०० टक्के

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील विदगाव येथील कै. अभिमन महादू वारके विद्यालयाचा दहावी निकाला १०० टक्के लागला असून पायल कोळी ही विद्यार्थीनी ९१.४० टक्के गुण मिळवून विद्यालयात पहिली आली आहे.

सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील विदगाव येथील कै. अभिमन महादू वारके विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. या परिक्षेत प्रथम क्रमांक आलेली मुलगी पायल कोळी हिला ९१.४० टक्के मिळाले. तिचा सत्कार संस्थेने अध्यक्ष डॉ. प्रशांत वारके ह्यांचे हस्ते करण्यात आला आहे. व्दितीय क्रमांक धनश्री कोळी हिला ९०.४० टक्के मिळाले असून हिचा सत्कार संस्थेचे सचिव विकास वारके यांच्या हस्ते करण्यात आला. तृतीय क्रमांक दिव्या सोनवणे व चेतना कोळी यांना ८९.८० टक्के मिळाले. त्यांचा सत्कार संस्थेचे समन्वयक रविंद्र पाटील यांचे हस्ते करण्यात आला. चौथा क्रमांक ललिता कोळी हिला ८७.०० टक्के व पाचवा क्रमांक अश्विनी कोळभ्‍ हिला ८६.६० टक्के मिळाले व त्यांचा सत्कार डॉ. प्रशांत वारके यांचे हस्ते करण्यात आला.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत वारके होते. या प्रसंगी संस्थेचे सचिव विकास वारके तसेचे संस्थेचे समन्वयक रविंद्र पाटील व मुख्याध्यापक आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

Protected Content