१०० टक्के निकाल : जितेश बाविस्कर प्रथम

जळगाव प्रतिनिधी । सीबीएसई बोर्ड बारावीचा निकाल आज (दि.३०) जाहीर झाला असून जळगाव येथील गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलचा निकाल १०० टक्के लागल आहे. या वर्षी जितेश बाविस्कर ९२.८ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आला आहे.

गोदावरी इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूलमधील सर्वच विद्यार्थी चांगल्या मार्कांनी उत्‍तीर्ण झाले असून शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात प्रथम क्रमांक जितेश संजय बाविस्कर ( ९२.८ टक्के), द्वितीय क्रमांक रितेश अनिल पाटील (९२.४ टक्के), तृतीय क्रमांक प्रचेता प्रकाश मुकुंद ( ८९ टक्के), चर्तुथ क्रमांक जयेश निलेश चौधरी (८८ टक्के) यांनी पटकाविला. गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, डॉ.वर्षा पाटील, डॉ.केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील, शाळेच्या प्राचार्य निलीमा चौधरी यांच्यासह सर्व शिक्षक वृंदानी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले.

 

 

Protected Content