पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध विकास कामांसाठी १०० कोटीचा निधी मंजुर (व्हिडिओ)

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पाचोरा – भडगाव तालुक्यातील विविध विकास कामांसाठी मागील आठवड्यात झालेल्या ५ दिवसांच्या अधिवेशनात १०० कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर केल्याचे आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पाचोरा येथील वरखेडी रोड वरील हॉटेल ओम साई जवळ ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयासाठी ४० कोटी रुपये, नगरदेवळा उड्डाणपूलासाठी, वडगाव बु” येथील भु संपादित जमिनीसाठी, १ कोटी १ लाख २३ हजार रुपये, पाचोरा, भडगाव तालुक्यातील राज्य महामार्ग क्रमांक ३ व ४ रस्त्यांसाठी २१ कोटी ७५ लाख रुपये, मागासवर्गीय वस्ती सुधारणेसाठी २ कोटी रुपये व ग्रामीण भागातील गावा – गावांना जोडणाऱ्या जिल्हा परिषदेच्या रस्त्यांसाठी २० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, नगराध्यक्ष संजय गोहील, तालुका प्रमुख शरद पाटील, जि. प. सदस्य उद्धव मराठे, बाजार समितीचे संचालक अनिल पाटील, पंढरीनाथ पाटील, शिवदास पाटील, सभापती अंबादास सोमवंशी, नगरसेवक सतिष चेडे, बापु हटकर, प्रविण ब्राम्हणे, स्विय सहाय्यक राजेश पाटील, दिपक पाटील, नितीन पाटील, वैभव राजपुत उपस्थित होते.

पाचोरा, भडगाव तालुक्यातील नगरदेवळा – गाळण – तारखेडा, कजगाव – गोंडगाव – सिंदी, कजगाव – नागद, पाटणादेवी – वाडे – गोंडगाव – कनाशी रस्ता, वाडे – गोंडगाव, कनाशी – देव्हारी, बाळद – वडगाव – कनाशी – गोंडगाव, पांढरद ते वडजी, वाडे ते नाव्रे, असे २१ कोटी ७५ लाख रुपये, ग्रामीण भागातील तारखेडा – सारोळा, तारखेडा ते लोहटार, डांभुर्णी ते अंबे वडगाव, होळ ते होळ फाटा, शेवाळे ते खडकदेवळा, सावखेडा मंदिर ते वरखेडी, बाळद ते उपलखेडा, लासुरे ते लासुरे फाटा, शिंदाड ते सातगाव, लासगांव ते कुरंगी, वडगाव टेक ते वडगाव असेरी, पिंपळगाव खु” ते धनगरवाडी, पहाण ते पहाण फाटा, लोहारी ते साजगाव, खडकदेवळा ते मोंढाळे, लासुरे ते राजुरी, सावखेडा ते चिंच फाटा, मोंढाळा ते डोंगरगाव, अंतुर्ली ते भातखंडे, लासगाव ते आसनखेडा, अंतुर्ली बु” ते सावखेडा, बदर्खे ते मोहलाई, नगरदेवळा ते पिंपळगाव, सार्वे ते पिंप्री,

पिंपळगाव (हरे) ते बहुलखेडा, शिंदाड ते सातगाव, पिंप्री ते चिंचपुरा, दहीगाव ते सामनेर, पिंपळगाव ते उमर विहीर, पिंपळगाव ते जरंडी, खडकदेवळा ते शेवाळे, मोंढाळे ते डोंगरगाव, मोंढाळे ते खडकदेवळा, अंबे वडगाव ते कुऱ्हाड, नाचणखेडा ते भडगाव, गाळण ते उपलखेडा, वाडे ते भवानी शेरी, वडधे ते वाक, वडधे ते कोठली, जुवार्डी ते बहाळ, उमरखेड ते बांबरुड, कोठली ते कोठली फाटा, वडजी ते रोकडा फार्म, सिंदी ते खेडगाव, बोरणार मारुती मंदिर ते स्मशानभुमी, गोंडगाव ते बांबरुड, पथराड ते पेंडगाव, सावदे ते कोळगाव अशा ५७ रस्त्यांसाठी २० कोटी रुपये, मागासवर्गीय वस्तीसाठी २५ गावात २ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून पाचोरा येथे उपजिल्हा रुग्णालयाच्या ५० खाटांसाठी ४० कोटी रुपये निधी मंजूर झाला असुन लवकरच या सर्व कामांची वर्क ऑर्डर निघणार असल्याची माहिती यावेळी आमदार किशोर पाटील यांनी दिली.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/4526442227460524

 

Protected Content