रस्ते विकासासाठी १०० कोटींच्या निधीचा आकडाच वांझोटा ! (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । मनपा फंडातून सत्ताधारी गटाने १०० कोटींचे रस्ते बनविण्याच्या नियोजनासाठी बैठक घेतली होती. मात्र, हा १०० कोटींचा निधी कसा उभारला जाईल?, असा प्रश्न विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी उपस्थित केला आहे.

त्यांनी आमदार राजूमामा भोळे आणि सत्ताधारी नगरसेवकांच्या भूमिकेवर बोट ठेवताना आधीच्या अटलांटा गुत्तेदाराला दिलेले काम आणि त्यानंतर झालेल्या आरोप – प्रत्यारोपांची आठवण करून देत हा संभाव्य घोटाळा जन्माला घालणारा गोधळ वाटतो अशी भीती व्यक्त केली आहे . त्यामुळे महापालिकेतील शह – काटशहाच्या वादावादीला पुन्हा रंग चढणार असल्याची चिन्हे दिसत आहेत

दुसरीकडे स्थायी समिती सभाप्रती शुचिता हाडा यांनी राज्य सरकार कडून या कामांसाठी विरोधकांनी निधी आणावा व शहराच्या विकासात हातभार लावावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

काल आमदार राजूमामा भोळे, सत्ताधारी गटाचे पदाधिकारी व मनपा आयुक्त यांची बैठक होऊन शहरात रस्ते विकासासाठी १०० कोटींची तरतूद करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. ही १०० कोटींची तरतूद महापालिका स्वतःच्या बळावर कशी करणार यावर बोट ठेवत सुनील महाजन यांनी महापालिकेची डबघाईला आलेली परिस्थिती सांगितली आहे . १०० कोटींचा हा नुसता जाहीर झालेला वांझोटा आकडा आहे . ही रक्कम उभारण्याचे शाश्वत पर्याय सत्ताधाऱ्यांनी सांगितलेले नसल्याने संशयाला बरीच जागा आहे . फक्त बैठक घेऊन ही रक्कम उभी राहणार नाही . पुढच्या चार वर्षातही महापालिका एवढी रक्कम उभी करू शकेल की नाही ही शन्का आहे . त्यामुळे कामासाठी गुंतवणूक करणारा ठेकेदार त्यांना आणायचा असेल तर त्यात संशय घेण्यास जागा आहे . असा अन्वयार्थ मांडणारी भूमिका सुनील महाजन यांनी घेतल्याने आता शहरातील राजकारण पुन्हा चर्चेत येणार आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/439362207011761/

Protected Content