यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या गाडऱ्या जामन्या येथील अनुदानित आश्रम शाळेत एका १० वर्षीय विद्यार्थ्यांचा सर्पदंशने मृत्यू झाला.
दरम्यान उपचारा करीता त्यास जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णलयात दाखल करण्यात आले तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी येथील यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गाड्ऱ्या-जामन्या (ता.यावल) येथे अनुदानित आश्रम शाळा आहे. या आश्रम शाळेत आकाश जग्गा बारेला (वय १०, रा. जळगाव जामोद, जि. बुलढाणा) हा शिक्षण घेत होता. तो रात्री आपल्या निवासस्थानी झोपला असताना झोपेत त्याला सापाने दंश केला. सदर प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारा करीता दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार युनूस तडवी करीत आहे.