पाचोरा नगरपरिषदेस राष्ट्रीय पातळीवरील स्कॉच सिल्व्हर अवॉर्ड प्रदान

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज  प्रतिनिधी |  राष्ट्रीय पातळीवरील अत्यंत मानाचा   समजला जाणारा स्कॉच सिल्व्हर अवॉर्ड पाचोरा नगरपरिषदेस नुकताच म्युन्सीपल गव्हर्नन्स (माझी वसुंधरा अभियान) या घटकाअंतर्गत मिळालेला आहे.

 

पाचोरा नगरपरिषदेने शहरात पर्यावरण संवर्धन करण्यात पुढाकार घेतला आहे. यात त्यांनी  उद्यान विकसित करणे, नदी स्वच्छता करणे, कचरामुक्त शहर बनविणे, अपारंपारिक ऊर्जा वापरास प्रोत्साहन देणे.  शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिक वस्तूंना बंदी घालणे, दैनंदिन घनकचरा संकलन करून त्याचे शास्त्रोक्त पध्दतीने व्यवस्थापन करणे आदी कामे करण्यात येत आहे.  या कामांचे नियोजनाकरीता असतांना येत असलेल्या अडचणी व त्या अडचणींवर यशस्वी मात करून नगर पालिकेने केलेल्या विकास कामाचे प्रकल्प (प्रोजेक्ट रिपोर्ट) तयार करून राष्ट्रीय पातळीवरील स्कोच संस्था, दिल्ली येथे पाठविण्यात आले होते. प्रकल्पाचा सविस्तर अभ्यास करून पाचोरा नगर पालिकेकडून मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना  प्रकल्पाची यशस्वी ऑनलाईन मांडणी करण्यास संधी देण्यात आली होती. मिळालेल्या संधीचे सोने करीत मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर यांनी प्रकल्पाची ऑनलाईन मांडणी अत्यंत उत्कृष्टरित्या करून नगरपालिकेने शहरातील नागरिकांचे अभिप्राय व ऑनलाईन वोटिंग मध्ये  उत्कृष्ट कामगीरी करीत उपांत्य फेरीमध्ये  प्रवेश केला. त्यानंतर अंतिम फेरीमध्ये देशातील प्रगत शहरांच्या प्रकल्पांशी स्पर्धा करून पाचोरा नगरपरिषदेने म्युनिसिपल गव्हर्नन्स या घटकात सिल्व्हर अवॉर्ड पटकवीला आहे.  याबाबत नगरपरिषद कर्मचारी व शहरातील सुजाण नागरीक यांनी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांचे अभिनंद केले आहे. सदरचे यश हे माझे एकटयाचे नसून ते मी व माझ्या कर्मचाऱ्यांच्या सामुहीक प्रयत्नाचे फळ असून यापुढे देखील असेच सहकार्य शहरातील नागरीकांनी केल्यास पाचोरा नगरपरिषदेचे नांव अधीक उज्वल करण्याचे मी नक्की प्रयत्न करेल असे प्रतिपादन शोभा बाविस्कर यांनी केले. त्याचप्रमाणे न. पा. कर्मचाऱ्यातमार्फत सद्भावना शपथ तसेच माझी वसुंधरा अंतर्गत हरित शपथ देखील घेण्यात आली.

 

Protected Content