मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त एक लाखाचा चेक

WhatsApp Image 2019 07 23 at 7.46.57 PM

चाळीसगाव, प्रतिनिधी | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने इतरत्र खर्च न करता चाळीसगाव तालुक्यातील किशोर बापू पाटील ढोमणेकर यांनी मुबंई येथे जाऊन मुख्यमंत्री निधीसाठी १ लाखांचा चेक दिला.

 

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पैसाचा दुरूपयोग टाळून त्याचा महाराष्ट्रातील गोरगरिब जनतेच्या हितासाठी वापर व्हावा या भावनेतून थेट मुख्यमंत्री सहाय्य निधीमध्ये १ लाख रुपयांची मदत केली. किशोर पाटील यांनी मुंबईला जाऊन १ लाखाचा चेक मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. याप्रसंगी त्यांच्यासोबत सहकार, पणन, व मदत पुनर्वसन मंत्री ना.सुभाष बापू देशमुख आणि जलसंपदा मंत्री व जळगावचे पालकमंत्री ना.गिरीश महाजन, बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आदी उपस्थित होते.

Protected Content