जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणारी तरूणीची नोकरीसाठी अनोळखी नंबरवरून संबंधितांनी नोकरीचे आमिष दाखवून सुमारे १ लाख ३८ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे उघडकीला आले आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणीची फसवणूक झाली आहे. ३ जून रोजी या तरुणीने नोकरी डॉट कॉम या साईटवर नोकरी मिळावी यासाठी नोंदणी केली. यानंतर काही वेळातच या तरुणीस अनोळखी नंबरवरुन फोन येऊन नोकरीबाबत माहिती देण्यास सुरूवात झाली. प्रोसेसिंग फी व विविध सुविधांसाठी पैसे भरावे लागतील असे सांगत भामट्यांनी तरुणीकडून सकाळी ११ ते रात्री ८ वाजेच्या दरम्यान दरवेळी वेगवेगळे कारण सांगून सुमारे १ लाख ३८ हजार ७८० रुपये ऑनलाईन पद्धतीने मागवुन घेतले. यानंतर संपर्क केला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याचे तरूणीच्या लक्षात आले. तरूणीच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय सपकाळे करीत आहे.