१ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी नोंदणी !

 

नवी दिल्ली वृत्तसंस्था | पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या घोषणेनंतर आज कोविनचे प्रमुख डॉ. आर.एस. शर्मा यांनी १ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटासाठी लसीकरणाची नोंदणी सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे.

या संदर्भात वृत्त असे की,  १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी माहिती दिली होती. यादंरि आच या वयोगटातील मुलांना १ जानेवारीपासून लसीकरणासाठी कोविनवर नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती कोविनचे प्रमुख डॉ. आर एस शर्मा यांनी दिली आहे.

१५ ते १८ वर्षे वयोगटातील मुले १ जानेवारीपासून कोविन ऍपवर लसीसाठी नोंदणी करू शकतील.  मुले नोंदणी करण्यासाठी त्यांचं शाळेचं ओळखपत्र वापरू शकतात. कोविनचे प्रमुख डॉ. आर एस शर्मा यांनी सांगितले की, कोविनवर नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी ओळखपत्र वापरण्याची वापरण्याची परवानगी दिली आहे. कारण काही मुलांकडे आधार कार्ड नसण्याची शक्यता आहे. १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांचे लसीकरण सोमवार, ३ जानेवारीपासून सुरू करण्यात येईल. या निर्णयामुळे करोना विरोधातील लढाई आणखी मजबूत होईल, असं मोदी म्हणाले होते.

Protected Content