अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील जिजाऊ बहुद्देशीय संस्था संचलित ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचे नवरस स्नेहसंमेलन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.
स्नेहसंमेलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून विभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव व पोलीस निरीक्षक अमळनेर विजय शिंदे साहेब हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ॲड ललिता पाटील यांनी भूषविले. स्नेहसंमेलनाची सुरुवात विद्येची आराध्य देवता माँ सरस्वती पूजनाने व अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. राकेश जाधव यांनी आपल्या मनोगतातून स्नेहसंमेलना सारख्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले व पुढील जीवनाची दिशा ठरते याविषयी आपले विचार व्यक्त केले.
पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. ॲड ललिता पाटील मॅडम यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सीबीएससी पॅटर्नचे शिक्षण मिळवण्यासाठी स्कूलची सुरुवात करण्यापासून तर स्कूल द्वारे व संस्थेद्वारे राबविण्यात जाणारे विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थी व पालक यांच्यातील परस्पर संबंध एका मित्रासारखे असावेत असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी जीवनात यशस्वी होण्याचे कानमंत्र त्यांनी दिले. सदर कार्यक्रमाप्रसंगी वर्षभरातील सायन्स एक्सपो फूड कार्निवल व विविध स्पर्धेतील विजयी विद्यार्थी प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात भक्ती गीत, शास्त्रीय संगीत गायन, विविध समूह नृत्य अविष्कार सद्यस्थितीतील पालक व विद्यार्थी यांच्यासाठी सोशल मीडिया या विषयावर उत्कृष्ट नाटिका विद्यार्थ्यांमार्फत सादर करण्यात आली. या सर्व नृत्यविष्कार व विविध कार्यक्रमांना उपस्थित पालक विद्यार्थी व रसिक प्रेमींनी जोरदार प्रतिसाद दिला. वाड्मयातील नवरस या संकल्पनेवर स्नेहसंमेलन आधारित होते.
स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन विद्यार्थी स्तुती कमल ओझा, वैष्णवी पवार, हर्षदा पाटील, निकिता पाटील, विलास पाटील, व अश्विनी चौधरी यांनी केले. सदर कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेची सचिव प्रा. श्याम पाटील , संचालक पराग पाटील, डॉ. प्रा. देवेश्री पाटील, प्राचार्य विकास चौधरी, प्रा. प्रकाश महाजन, डॉ. प्रतिभा मराठे, प्रा. आशीष शर्मा, उपस्थित होते. सदरील स्नेहसंमेलनाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक निलेश पाटील सर यांनी केले स्नेहसंमेलन यशस्वीतेसाठी शिक्षक वर्ग महेश पाटील सर भट सर व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.