५ हजारांची लाच घेताना पोलीस अडकला

 

जळगाव : प्रतिनिधी । गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून ५ हजारांची लाच घेताना आज नशिराबाद पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल सतिष रमेश पाटील,(वय-43) याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून अटक केली .

.पाळधी ( ता.धरणगाव) येथील तक्रारदाराने ही तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली होती . आज आरोपीने स्वीकारलेली लाचेची ५ हजारांची रक्कम या पथकाने हस्तगत केली आहे .

-.
तक्रारदार यांच्या विरूद्ध असलेल्या अर्जावरून गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात आरोपीने आज ( दि.08 ) तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष 5,000/-रूपये लाचेची मागणी करुन लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वतः स्वीकारली. ही कारवाई नशिराबाद पोलीस स्टेशन येथे करण्यात आली.

सापळा पथकात गोपाल ठाकुर, (पोलीस उप अधीक्षक) , पो नि संजोग बच्छाव, सहाय्यक फौजदार रविंद्र माळी, पोहेकॉ. अशोक अहीरे, .सुनिल पाटील, सुरेश पाटील, पोना.सुनिल शिरसाठ, मनोज जोशी, जनार्धन चौधरी, पोकॉ.प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, .ईश्वर धनगर. यांचा समावेश होता . त्यांना सुनील कडासने (पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, ९ नाशिक) निलेश सोनवणे (अपर पोलीस अधीक्षक ) यांनी मार्गदर्शन केले .

Protected Content