भडगाव : प्रतिनिधी । येथिल महादेव गल्लीतील कैलास पाटील यांचा पाच वर्षांपूर्वी शार्टसर्कीटमुळे चारा जळाला होता. त्यांना नुकतीच महावितरणकडून ४ लाख २५ हजार रूपये भरपाई मिळाली.
यासाठी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील यांनी पाठपुरावा केला होता.
२६ मे २०१६ रोजी कैलास पाटील यांचा खळ्यातील सव्वा चार लाख रूपये कींमतीचा चारा वीज तारांच्या शाॅर्टसर्कीटमुळे जळून खाक झाला होता. त्यामुळे त्यांनी वीज कंपनीकडे भरपाईची मागमी केली होती. यासाठी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील यांनी वीज कंपनीच्या पाचोरा, जळगाव व कल्याणच्या कोकण उपप्रादेशिक विभागाच्या कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर कैलास पाटील यांना कार्यकारी अभियंता एस.ए.डसकर यांच्या हस्ते सव्वा चार लाखाचा धनादेश देण्यात आला. यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे, अधीक्षक अभियंता फारुक शेख, तत्कालीन कार्यकारी अभियंता वडर, उपकार्यकारी अभियंता अजय धामोरे, जळगाव सर्कल ऑफिसचे उपकार्यकारी अभियंता विशाल खंडारे, सहाय्यक अभियंता एम. डब्ल्यू. कठाणे, सहाय्यक अभियंता बानबाकुडे, उपव्यवस्थापक आर. एस. बिलारी, तालुका कृषी अधिकारी बी. बी. गोर्डे व पशुवैद्यकीय अधिकारी एन.जी. राजपूत यांनी सहकार्य केले.