जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हॉस्पिटलचे बिल कमी करण्याच्या कारणावरून ५ लाख रुपयांची खंडणीची मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रकरणी एकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती की, शहरातील दंगलग्रस्त कॉलनीत . मुदीर कादिर खान (वय-३४) यांच्या मालकीचे सारा हॉस्पिटल आहे. १४ एप्रिल २०२१ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास शोहेब पटेल रा. नाचनखेडा ता. जि. जळगाव यांनी वर्तमानपत्रात खोटी माहिती दिली. तसेच २३ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी अनोळखी २ जण हॉस्पिटलमध्ये येऊन धमकी देत डॉक्टराकडून ५ लाखाची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास मीडियामध्ये अशीच बदनामी करू, अशी धमकी दिली. या संदर्भात मुदीर कादिर खान यांनी गुरुवार २७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शोहेब पटेल रा. नाचणखेडा ता.जि. जळगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहे.