जळगाव, प्रतिनिधी । दिल्लीच्या सीमेवर संयुक्त किसान मोर्चातर्फे आयोजित आंदोलनाला पाठींबा व केंद्राने लागू केलेले तीन कृषी विषयक कायदे, इंधन दरवाढ विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकसंघर्ष मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची सांगता हॉर्न वाजून निषेध नोंदवून करण्यात आली.
मागील ७ महिने ११ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर संयुक्त किसान मोर्चातर्फे आंदोलन करण्यात येत आहे. लोकसंघर्ष मोर्चा संलग्न अखिल भारतीय किसान संघर्ष समिती व संयुक्त किसान मोर्चातर्फे या आंदोलनास पाठींबा दर्शविण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा आंदोलनाद्वारे निषेध करण्यात आला. या आंदोलनाची सांगता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हॉर्न वाजून करण्यात आली. याप्रसंगी सचिन धांडे, अमोल कोल्हे,नाना महाले, मो. असिफ देशमुख , फहीम पटेल, मुकेश सावकारे, कृष्णा सावळे, सुमिद साळुंके, योगेश पाटील, कैलास मोरे, सीताराम सोनवणे, कृष्ण जमदाडे, देविदास पारधी, ज्ञानेश्वर सोनवणे, अजय मनुरे आदी उपस्थित होते.
भाग १
https://www.facebook.com/508992935887325/videos/521760069019259
भाग २
https://www.facebook.com/508992935887325/videos/866895357248573