मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या १०० दिवसांपेक्षा जास्त काळ बंद असलेली ही हॉटेल्स ८ जुलैपासून उघडणार आहेत. मिशन बिगीन अगेन अंतर्गत राहण्याची व्यवस्था असलेली हॉटेल्समध्ये ३३ टक्के ग्राहकांना राहण्याची संमती राज्य सरकारने दिली आहे. मात्र कंटेन्मेंट झोनमध्ये हॉटेल आणि लॉजला स्पष्टपणे परवानगी नाकारण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव आणि इतर अधिकाऱ्यांची हॉटेल असोसिएशसोबत रविवारीच एका व्हिडीओ कॉन्फ्रेसिंगद्वारे घेतलेया बैठकीत हॉटेल आणि लॉज सुरु करण्यावर हॉटेल असोसिएशनच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली होती. तसेच यावेळी त्यांनी लवकरच हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार ८ जुलैपासून पासून हॉटेल्स उघडण्यास परवानगी दिली आहे. हॉटेल आणि लॉज जर क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरात असल्यास महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाच्या पुढील आदेशापर्यंत त्या क्वारंटाईन सुविधेसाठीच वापरल्या जातील. किंवा त्यांचा उर्वरित भाग (67 टक्के) महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाकडून क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरला जाऊ शकतो, असेही यात नमूद केले आहेत.