जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हुंड्यासाठी २ लाखांसाठी विवाहितेचा छळ केल्याची घटना उघउकीस आली आहे. याप्रकरणी सासरच्या मंडळींविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील सालार नगरातील माहेरवाशीन हुसाना बानो मर्द फैज मोहंमद (वय-४०) यांचा विवाह फैज मोहंमद गुलाम रसुल यांच्यासोबत झाला होता. विवाहितेला हुंड्यापोटी २ लाखांच्या रकमेसाठी सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा छळ केला जात होता. छळ असह्य झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. दरम्यान, त्यांनी दि. २५ रोजी एमआयडीसी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पती फैज मोहंमद गुलाम रसुल, सासू हमीदाबी गुलाम रसूल, सासरे गुलाम रसुल नूर मोहंमद, नणंद सलमाबी अब्दुल कलीम रा. शेंदुर्णी ता. जामनेर व नणंद शहनाज परवीन अकबर रा. अंबरनाथ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना सुशिल सोनार करीत आहे.