चाळीसगाव, प्रतिनिधी । येथील हिरकणी महिला मंडळातर्फे आपला जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या कोरोना योद्धयांना पीपीई किट व थर्मस स्कॅनरचे वाटप करण्यात आले.
हिरकणी महिला मंडळाच्या अध्यक्ष सुचित्रामाई राजपूत यांच्याकडून पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच नगरपालिका आरोग्य सफाई कर्मचारी यांना कोरोना या आजाराची लागण होऊ नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पीपीई किट व थर्मस स्कॅनर याची वाटप करण्यात आले. यावेळेस कार्यक्रमाला पो. नि. ठाकूरवाड , पो. उप.नि. भामरे, आरोग्य सभापती सायलीताई रोशन जाधव यांचे पती सामाजिक कार्यकर्ते रोशनभाऊ जाधव तसेच सर्व पत्रकार प्रफुल साळुंखे, मुरादभाई पटेल, प्रताप भोसले, नगरसेवक दीपक पाटील,रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. संदीप देशमुख व व रोटरी क्लबचे सर्व सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.