काही आठवड्यांसाठी भारतात लॉकडाऊन करा”; अमेरिकेच्या आरोग्य सल्लागारांचे मत

 

 

वाशिंग्टन : वृत्तसंस्था ।  कोरोना साखळी तोडण्याचं आव्हान आहे. त्यामुळे भारतात  पुन्हा लॉकडाऊन लावण्याचा सल्ला अमेरिका प्रशासनातील मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. अँथनी एस फौसी यांनी दिला आहे. त्यांनी अमेरिकेच्या सात राष्ट्राध्यक्षांसोबत काम केलं आहे.

 

“भारतात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. रुग्णालयात ऑक्सिजन आणि बेड्स मिळत नाहीत. औषधांचा काळाबाजार सुरु आहे. रुग्णांसोबत सामन्य जनता अडचणीत आली आहे. कोरोनाच्या विस्फोटामुळे भारतात यावेळी कठीण परिस्थिती आहे. त्यामुळे आता  साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लावण्याची गरज आहे. तरच रुग्णसंख्या कमी होईल.”, असं मत डॉ. फौसी यांनी एका  मुलाखतीत मांडलं.

 

“लसीकरण मोहीम आणखी वेगाने वाढवण्याची गरज आहे. भारतात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. त्यामुळे कमिशन गठीत करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ऑक्सिजन आणि औषधांचा पुरवठा करणं सोपं होईल”, असंही त्यांनी सांगितलं.

 

फेब्रुवारीमध्ये डोकं वर काढलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेनं अवघ्या तीन महिन्यातच विध्वंसक परिस्थितीत ढकललं आहे. दररोज लाखो लोक करोनाच्या तडाख्यात सापडत असून, अनेक कुटुंबं उघड्यावर आली आहे. भयावह गोष्ट म्हणजे दुसऱ्या लाटेत मृतांचा आकडा प्रचंड वेगाने वाढला असून, फक्त एप्रिल महिन्याच्या ३० दिवसांत देशात ४५,००० नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Protected Content