सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । येथील हॉटेल हिना पॅलेसमध्ये साडे चार लाख रूपये मूल्याच्या दारू चोरीमध्ये फिर्याद देणारा हॉटेलचा मॅनेजर हाच प्रमुख सूत्रधार निघाला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, सावदा येथील हॉटेल हिना पॅलेसमध्ये चोरी झाल्याचे दोन दिवसांपूर्वी दिसून आले होते. यात चोरट्यांनी ४ लाख ६७ हजार रूपये मूल्य असणार्या दारूची चोरी केल्याची फिर्याद या हॉटेलचा मॅनेजर कृष्णा सुधाकर कोष्टी ययाने दिली होती. यावरून सावादा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
दरम्यान पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवली असता हॉटेलचा मॅनेजर कृष्णा सुधाकर कोष्टी यानेच हॉटेलमध्ये डल्ला मारून चोरीचा बनाव केल्याचे निष्पन्न झाले. त्याने ही दारू.पुरूषोत्तम शिवाजी देवकर, गोविंद घनश्याम भंगाळे, मयूर हेमचंद्र बर्हाटे, तुषार पाटील, योगीराज लक्ष्मण भंगाळे, व जाब्या उर्फ शेख जाबीर शेख खलील (सर्व रा. सावदा)आदींसह अनेकांना विकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. यांच्या विरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला असून याना अटक करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००