हिंदू-मुस्लिम बांधवांनी आगामी सण शांततेत साजरे करावेत – पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

जळगाव प्रतिनिधी । देश शांत करण्यापेक्षा गाव शांत करा, कायद्याची भाषा बोलण्यापेक्षा प्रत्येकाने गुण्या गोविंदाने रहावे, हिंदू-मुस्लिम बांधवांनी येणारे सण शांततेत साजरी करावेत आवाहन, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या मंगलम हॉलमध्ये शांतता कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी व्यासपिठावर आमदार राजूमामा भोळे, महापौर भारतीताई सोनवणे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधिक्षिका भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस अधिक्षक डॉ. निलाभ रोहम, पोलीस निरीक्षक अकबर पटेल, फारूख शेख, जमिल देशपांडे, गफ्फार मलिक, माजी उपमहापौर करीम सलार, मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी यांच्यासह सर्व समाजाचे नागरिक उपस्थित होते.

ना. पाटील पुढे बोलतांना म्हणाले की, मुस्लिम बांधवांनी कोरोना सांभाळत ईद साजरी करावी, कोणत्याही सणासाठी पोलीस कर्मचाऱ्याला बारा तास ऑनड्यूटी उभे रहावे लागते, आतातर कोरोनाने कहर केला आहे. त्यामुळे पोलीसांना कोणताही त्रास होणार नाही म्हणून आगामी येणारे सण शांतते साजरे होतील. बकरी ईदच्या वेळेस मुस्लिम बांधवांना हिंदू बांधव मदत करेल, तर गणेशोत्सवात हिंदू बांधवांना मुस्लिम बांधवांना सहकार्य करा म्हणजे येथून पुढे होणारे सण शांतते होतील. सणाच्या काळात सोशल मीडियावर येणाऱ्या संदेशावर, अफवांवर बळी पडू नये, कोणत्याची मजकूराची बातमी खात्री केल्याशिवाय फारवर्ड करू नये, सोशल मीडियावर जुन्या बातम्या पसरविले जात असल्याची माहिती, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

Protected Content