जळगाव , प्रतिनिधी | हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने शिवसेना जळगाव जिल्हा, महानगर जळगाव आणि युवा विकास फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने येथील सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवनात विनामुल्य आरोग्य महाशिबीर व मोफत औषधी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गरजुंनी या आरोग्य शिबीराचा लाभ घेतला. लेवा भवन येथे वृक्षारोपण ना. गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात जळगाव जिल्हा पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी महापौर विष्णू भंगाळे, महापौर जयश्री महाजन उपमहापौर कुलभुषण पाटील, माजी महापौर नितीन लट्ठा, महिला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदा पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, जळगाव शहर विधानसभा संपर्क प्रमुख प्रा. समाधान पाटील व श्याम कोगटा, नगरसेवक मनोज चौधरी, महिला आघाडी महानगरप्रमुख शोभा चौधरी, सरीता कोल्हे, युवासेना सहसचिव विराज कावडीया, स्वप्निल परदेशी, नितीन सपके, प्रशांत सुरळकर, मानसिंग पाटील, प्रकाशअण्णा पाटील, मनोज गायकवाड, उमेश चौधरी, तसेच शिवसेना महिला आघाडी, युवासेना, पदाधिकारी,लोकप्रतीनिधी, उपस्थित होते. शिबीरात डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. किरण पाटील,आर्थो डॉ. संजय पाटील, एम एस डॉ. दिपक पाटील, डॉ.. धिरज चौधरी, आर्थो डॉ. सचिन खर्चे, गायनॉलॉजिस्ट डॉ. सारीका पाटील या तज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली.
यावेळी ना. गुलाबराव पाटील यांनी सदर कार्यक्रमाचे कौतुक करत गोरगरीबांसाठी केलेल्या वैद्यकिय मदत बाळासाहेबांना जयंतीनिमित्त हीच भेट आहे असे सांगुन पदाधिकाऱ्यानी वंदनीय बाळासाहेबांची जयंती अशा विविध लोकोपयोगी उपक्रमांनी वेळोवेळी सहकार्य करत आपण समाजाचे देणे लागतो या ध्येयाने प्रेरीत होवून कार्य करावे. सध्याच्या कोरोनाच्या काळात गरज लक्षात घेवून, आम्ही वंदनीय बाळासाहेबांच्या प्रेरणेने आरोग्य शिबीराचे आयोजन केले आहे. यात गरजवंतांना नक्कीच फायदा होईल भविष्यात देखिल शहरी ग्रामीण भागात शिवसेना पक्षाच्या माध्यमातुन असे समाजपयोगी उपक्रम राबविण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. असे, शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी सांगितले. विनामुल्य आरोग्य महाशिबीर व मोफत औषधी वाटप यांचे उद्घाटन करून शहरातील गरीब व गरजु नागरीकांना कोरोना नियमांचे पालन करून शहरातील तज्ञ डॉक्टरानी तपासणी करून दिलेल्या औषधी मोफत देण्यात आल्या. डॉ. दिपक पाटील यांच्या निर्मलदिप हॉस्पीटल नवी पेठ जळगांव येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त दर गुरूवारी सकाळी ११ ते १ दरम्यान मोफत तपासणी करण्यात येईल. या तपसणीसाठी पास सुनिल मेडिकल जळगाव येथे उपलब्ध आहेत. तरी गरजूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. सुत्रसंचालन चांद सर व आभार ग.स. संचालक महेश पाटील सर यांनी मानले. यशस्वीतेसाठी राजेश वारके, ललित महाजन, महेंद्र पाटील, शैलेश काळे, विक्की काळे, स्वप्निल रडे, प्रा. उमेश पाटील, सचिन पाटील, अमोल मोरे, सुनिल पाटील, यतीन रोटे, अजय काशिद, नरेंद्र बोरसे, सचिन महाजन, दिपक भारंबे, हर्षल चौधरी, यांनी सहकार्य केले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/362673521863912