हिंगोणा जवळ डंपर व क्रूझरचा अपघात; दोन ठार

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगोणा गावाजवळ डंपरने दिलेल्या जोरदार धडकेत क्रूझरमधील 10 जण ठार झाले असून 7 जखमी झाले आहेत. हा अपघात रात्री झाला.

याबाबत वृत्त असे की, रविवारी रात्री अकराच्या सुमारास चिंचोल (ता.मुक्ताईनगर) येथील चौधरी कुटुंबीय क्रुझर (क्र.एमएच.१९- सीव्ही. १७७२) चारचाकीने मुक्ताईनगरकडे जात होते. दरम्यान, हिंगोणा गावाजवळ समोरून येणार्‍या डंपरने (क्र.एमएच. १९-७७५८) त्यांच्या चारचाकीला जोरदार धडक दिली. यात मंगलाबाई ज्ञानेश्‍वर चौधरी (वय ५५) व प्रभाकर नारायण चौधरी (वय ६३) यांचा मृत्यू झाला. तर सुवर्णा जितेंद्र चौधरी (वय ३५), मीनाबाई प्रफुल चौधरी (वय २७), रिया जितेंद्र चौधरी (वय १४), अन्वी नितीन चौधरी (वय ५), सर्वेश नितीन चौधरी (वय ९, सर्व रा. चिंचोल, ता.मुक्ताईनगर) यांच्यासह एकूण १२ जण जखमी झाले आहेत. जखमींवर यावल येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. चौधरी कुटुंब हे चोपडा येथील विवाह सोहळ्याला हजेरी लाऊन घरी जात असतांना हा भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.

Protected Content