पहुर लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील हिंगणे पिंप्री शिवारातील शेतातून शेतकऱ्याचे ३ एकर शेतातील मका चोरीला केल्याची घटना उघडकीला आली आहे. या संदर्भात शुक्रवार ५ मे रोजी सायंकाळी ६ वाजता पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मयूर मंगलसिंग पाटील (वय-२१, रा. हिंगणे पिंपरी ता. जामनेर) आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून तो आपला उदरनिर्वाह करतो. २४ एप्रिल रोजी सकाळी ५ वाजता गावात राहणारा प्रल्हाद दगडू काळे यांनी शेतातील ३० हजार रुपये किमतीचा मका चोरून नेला. या संदर्भात जाब विचारला असता त्याने शेतकरी मयूर पाटील याला शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी मयूर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी प्रल्हाद दगडू काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण चौधरी करीत आहे.