हा प्रश्न मला नाही, चीनला विचारा म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांचा पत्रकार परिषदेतून काढता पाय

न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) कोरोना व्हायरस चाचणी ही जागतिक स्पर्धा म्हणून का पहिली जाते? या प्रश्नावर “हा प्रश्न मला नाही, चीनला विचारा” अशा शब्दात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका महिला पत्रकाराला उत्तर देत पत्रकार परिषद आटोपती घेत तेथून निघून गेले.

 

अमेरिकेतील करोना परिस्थितीसंदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. व्हाईट हाऊसमधील रोझ गार्डनमध्ये ही पत्रकार परिषद झाली.’करोना चाचण्या करण्यात जगात अमेरिका आघाडीवर’ असे लिहिल्लेले एक बॅनर ट्रम्प यांच्या मागे लावण्यात आले होते. यावेळी सीबीएस न्यूजच्या पत्रकार वेईजिया जियांग यांनी ट्रम्प यांना या बॅनरवरील ओळीवरून दररोज अमेरिकन लोकांना आपल्या जिवाला मुकावे लागत आहे. तुमच्यासाठी तपासणी ही जागतिक स्पर्धा का झाली आहे?, असा सवाल ट्रम्प यांना विचारला. त्यावर बरं, जगात सर्वत्र नागरिक कोरोनामुळे आपला जीव गमावत आहेत. कदाचित हा प्रश्न आपण चीनला विचारला पाहिजे. मला विचारु नका. हा प्रश्न चीनला विचारा. जेव्हा आपण चीनला हा प्रश्न विचाराल, तेव्हा तुम्हाला एक अतिशय विलक्षण उत्तर मिळेल, असे उत्तर ट्रम्प यांनी दिले.

Protected Content