…हा तर वैचारिक क्षुद्रपणा ! : राऊत यांची टीका

मुंबई प्रतिनिधी | गुलाब नबी आझाद हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून निवृत्त झाले तेव्हा पंतप्रधान मोदी व्याकूळ झाले व रडले; पण त्यांच्या जागी आलेल्या मल्लिकार्जुन खरगे यांचे ऐकायचे नाही ही सरकारची भूमिका नको तितक्या हटवादीपणाची आहे. हा वैचारिक क्षुद्रपणा आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी आज टीकास्त्र सोडले आहे.

शिवसेनेच खासदार संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक या स्तंभातून पुन्हा एकदा मोदींना लक्ष्य केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होऊन आता जवळपास १५ दिवस होत आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अद्यापही ससंदेत हजेरी लावली नाही, यावरुन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांना लक्ष्य केलं आहे. तसेच, राज्यसभेच्या १२ खासदारांचे निलंबन हे संविधानाच्या कुठल्याही कलमान बसत नाही. गेल्या १५ दिवसांपासून हे खासदार महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ बसून आहेत, पण देशाच्या उपराष्ट्रपतींनी त्यांची साधी दखलही घेतली नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

यात पुढे म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी यांना गंगेने साद घातली म्हणून ते काशीला गेले व तेथेच रमले; पण संसद सुरू होऊन १४ दिवस झाले तरी ते संसदेत फिरकले नाहीत. याचे कारण म्हणजे संसदेत आज सक्षम विरोधी पक्ष नाही. केंद्र सरकारला विरोधकांचे भय सोडाच, पण आदरही नाही. गुलाब नबी आझाद हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून निवृत्त झाले तेव्हा पंतप्रधान मोदी व्याकूळ झाले व रडले; पण त्यांच्या जागी आलेल्या मल्लिकार्जुन खरगे यांचे ऐकायचे नाही ही सरकारची भूमिका नको तितक्या हटवादीपणाची आहे. हा वैचारिक क्षुद्रपणा आहे.

Protected Content