हार्दीक पांड्यांवर कारवाईचे संकेत

मुंबई प्रतिनिधी । एका दूरचित्रवाणी कार्यक्रमातील विधानाबद्दल क्रिकेटपटू हार्दीक पांड्या याने माफी मागितली असली तरी त्याच्यावर बीसीसीआयतर्फे कारवाई होण्याचे संकेत मिळाले आहेत.

भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने कॉफी विथ करण ६ या कार्यक्रमात केलेले धक्कादायक विधान वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. त्याने या विधानाबद्दल माफी मागितली असली तरी त्याच्यावर कारवाई करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे. या कार्यक्रमात पांड्यासोबत भारताचा सलामीवीर लोकेश राहुलही उपस्थित होता. कार्यक्रमाच्या प्रक्षेपणानंतर पांड्याच्या अनेक मुद्यांवर नेटिझन्सने सडकून टीका केली. पांड्याचे ते विधान महिलांचा अनादर करणारे असल्यामुळे अनेकांनी पांड्याला चांगलेच सुनावले. प्रशासकीय समितीने पांड्या व राहुल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे आणि २४ तासांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.
सोशल मीडियात पांड्याच्या विधानाचे तीव्र पडसाद उमटले. यामुळे त्याने इस्टाग्रामवरून सर्वांची माफी मागितली. तो म्हणाला,फफकॉफी विथ करण या कार्यक्रमातील माझ्या वक्तव्यावर कोणाची मनं दुखावली असतील, तर त्यांची माफी मागतो. मला कोणालाही दुखवायचे नव्हते. अर्थात, असे असले तरी आता त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Add Comment

Protected Content