Home राष्ट्रीय हार्दीक पटेल चढणार बोहल्यावर

हार्दीक पटेल चढणार बोहल्यावर

0
35

अहमदाबाद वृत्तसंस्था । पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दीक पटेल हा २७ जानेवारी रोजी आपली बालमैत्रीण किंजल पारीख हिच्यासोबत विवाहबध्द होत आहे.

हार्दीकच्या वडिलांनी याबाबत आज प्रसारमाध्यमांना माहिती दिली. यानुसार सुरेंद्रनगर जिल्ह्यातील दिगसर गावी अत्यंत साधेपणानं हा विवाहसोहळा पार पडणार आहे. या विवाहाचे सर्व विधी पटेल कुटुंबीयांचं कुलदैवत असलेल्या बहुचर आणि मेल्दी माता मंदिरात होणार आहेत. किंजल ही हार्दिकची बहीण मोनिका हिच्यासोबत शाळेत होती. ती कॉमर्स शाखेची पदवीधर असून सध्या गांधीनगरमधील एका लॉ कॉलेजातून एलएलबी करत आहे. हा विवाह सोहळा मोजक्या मंडळीच्या उपस्थितीत होणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound