जळगाव प्रतिनिधी । माल वाहतूकदार वाहनांसाठी जिल्ह्यातून जाणार्या महामार्गांना लागून असणारे पेट्रोलपंप आता नेहमी प्रमाणे खुले राहणार असून जिल्हाधिकार्यांनी रात्री उशीरा याबाबतचा लेखी आदेश जारी केला आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत जिल्ह्यातील पेट्रोल पंपसाठी सकाळी सात ते दहा आणि सायंकाळी चार ते सात ही वेळ जाहीर करण्यात आली होती. यात अत्यावश्यक सेवांसाठी आणि ते देखील शासकीय पास असेल तरच पेट्रोल वा डिझेल दिले जात होते. आता लॉकडाऊनसाठी राज्य शासनाने नवीन निर्देश जारी केले आहेत. यानुसार जिल्हा प्रशासनाने पेट्रोल पंप चालकांसाठी आधीची अट शिथील केली आहे. याच्या अंतर्गत जिल्ह्यातून जाणार्या हायवेंना लागून असणार्या पेट्रोल व डिझेल पंपमध्ये आधीप्रमाणे पेट्रोल/डिझेल विक्री करता येणार आहे. अर्थात, फक्त मालवाहतूक करणार्या वाहनांनाच इंधन मिळणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तर महापालिका व नगरपालिका हद्दीपासून तीन किलोमीटरच्या आत असणार्या पेट्रोल पंपांना यातून वगळण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी याबाबतचे लेखी निर्देश जारी केले आहेत.
या निर्देशानुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ म्हणजेच पारोळा ते मुक्ताईनगर; राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३-जे जळगाव ते पाचोरा-चाळीसगाव-नांदगाव मार्ग; राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३-एफ जळगाव ते पहूर-सिल्लोड-औरंगाबाद; राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३-एल म्हणजे पहूर-जामनेर-बोदवड-मुक्ताईनगर-बर्हाणपूर आदी मार्गांवरील पेट्रोल पंप आता आजपासून नियमित वेळेप्रमाणे खुले राहणार आहेत. यात वर नमूद केल्यानुसार शहरांच्या हद्दीपासून तीन किलोमीटरच्या आतील पेट्रोल पंपांचा अपवाद असणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जारी केलेल्या निर्देशाची प्रत आपण खाली पाहू शकतात.
प्रतिमा क्रमांक-१
प्रतिमा क्रमांक-२
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००