हाथरस येथील घटनेचा भुसावळ वकील संघातर्फे निषेध

 

भुसावळ, प्रतिनिधी । उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या निर्भया बलात्कार व हत्येच्या घटनेचा भुसावळ वकील संघाकडून तीव्र निषेध व्यक्त करत या प्रकरणातील गुन्हेगारांविरुद्ध फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी उप विभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनाचा आशय असा की. हाथरसच्या दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासनाकडून झालेल्या पीडित परिवाराची हेळसांड आणि मीडियाची मुस्कटदाबी या सारख्या अक्षम्य आपराधाचा व या सर्व प्रकरणांवर पडदा टाकणाऱ्या सरकारचा भुसावळ वकील संघाकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. रातोरात निर्भयाचा अंतिम संस्कार करून गुन्हेगारांना सरकार अभय देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करून सदर खटला उत्तर प्रदेश सोडून देशाच्या उच्च न्यायालयात चविण्यात यावा. पीडितेच्या कुटुंबाला संरक्षण देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनांवर अॅड. जास्वदीं भंडारी, चित्रा आचार्य, सूचित जयस्वाल, विजया , सुमन सपकाळे, संगिता चंदन आदींची स्वाक्षरी आहे.

Protected Content