भाजपतर्फे दोन दिवसीय नवीन मतदार नोंदणी अभियानास प्रारंभ

 

जळगाव, प्रतिनिधी । आज दि.१२ डिसेंबर रोजी जळगाव जिल्हा महानगरतर्फे भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दोन दिवसीय नवीन मतदार नोंदणी अभियानाचा शुभारंभ रामानंद नगर परिसर मंडल क्र. ६ येथुन करण्यात आला.

नवीन मतदार नोंदणी अभियान  महानगरच्या ९ ही मंडलांमध्ये राबविण्यात येणार असून याचा शुभारंभप्रसंगी जळगाव ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष तथा आ. राजुमामा भोळे , महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, महापौर सौ. भारतीताई सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समितीचे सभापती राजेंद्र घुगे पाटील, सभागृहात नेते ललित कोल्हे, नगरसेवक कैलास सोनवणे, महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, महेश जोशी, विधानसभा क्षेत्र प्रमुख दिपक साखरे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, उपाध्यक्ष चंदन महाजन, शरिफा तडवी, चिटणीस महेश चौधरी, राहुल वाघ, ज्योती निंभोरे, निला चौधरी प्रा. भगत निकम , कोषाध्यक्ष जिवन अत्तरदे, सोशल मीडियाचे अक्षय चौधरी, महानगर कामगार मोर्चा अध्यक्ष कुमार श्रीरामे, मंडल क्र ६ चे अध्यक्ष अजित राणे, नगरसेविका गायत्री राणे, सचिन पाटील, मंडल उपाध्यक्ष लक्षमण धनगर, दिपक पाटील, अरूण चौधरी, बंटी नेरपगरे, अमित शिंदे, युवा मोर्चा महानगरचे ऋषीकेश येवले, ओबीसी मोर्चाचे मनोहर चौधरी, जयश विसपुते, तेजस कोष्टी, कार्तिक पाटील, सागर जोशी, यांच्या सह पदाधिकारी व मतदान नोदणी करणारे नागरी उपस्थिती होती.

Protected Content