जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शाहू नगर परिसरातील ट्राफीक गार्डन येथे हातागाडी लावण्यावरून तरूणाला शिवीगाळ व जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शनिवारी २१ ऑगस्ट रोजी शहर पोलीस ठाण्यात एकावर अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शरीफ सत्तार भिस्ती (वय-३६) रा. शाहूनगर हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवारी २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शाहू नगरातील रोझ गार्डन येथे हातगाडी लावण्यावरून त्याची आणि वैशाली प्रविण पाटील रा. शाहू नगर, जळगाव याच्या वाद झाला. दरम्यान शरीफ भिस्ती याला महिलेने शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात रात्री १० वाजता शरीफ भिस्ती याने दिलेल्या फिर्यादीवरून महिलेवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरूण सोनार करीत आहे.