हवेत फायरिंग करणाऱ्या माजी महापौराच्या मुलासह तिघांना अटक; शहर पोलिसांची कारवाई (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । शहरातील उस्मानिया पार्क परिसरात गुरूवारी सायंकाळी झालेल्या दोन जणांच्या वादात हवेत फायरिंग करणाऱ्या मद्यपी चौघांना अवघ्या पाच तासात शहर पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्या ताब्यातील दोन गावठी बनावटीचे कट्टे हस्तगत केले. यात माजी महापौर अशोक सपकाळे यांच्या मुलासह तीन संशयितांवर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सविस्तर महिती अशी की, शहरातील खिश्तीया (उस्मानिया) पार्क परिसरात एका विहिरीजवळ संशयित आरोपी राजू उर्फ बाबू अशोक सपकाळे (वय-३०) रा. क्रांती चौक, शिवाजी नगर, मिलिंद शरद सकट (वय-२७) रा. गेंदालाल मिल, मयुर उर्फ विकी दिपक अलोणे (वय-२६) रा. आर.वाय.पार्क आणि इम्रान उर्फ इमु शहा रशिद शहा (वय-२८) रा. गेंदालाल मिल हे चौघे सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास बियर पीत बसले होते. त्यावेळी दोन अज्ञात व्यक्ती त्यांच्या समोरून जात असतांना यातील मयूरने कोठे जात आहात ? असे विचारल्याने दोघात वाद झाला. वादाचे थोड्यावेळात हाणामारीत झाले. तर मयूरने बियरची बाटली फेकुन मारली असता यात भांडण सोडविण्यासाठी आलेल्या सुफियान शकिल बेग मिझा (वय-२२) रा. शिवाजीनगर हुडको यांच्या उजव्या डोक्याला जखमी झाली. त्याचवेळी मयूर अलोणेने त्याच्याजवळ असलेल्या गावठी कट्ट्यातून हवेत दोन फायरिंग केले व तेथून चौघेजण पळाले.

घटनास्थळाहून दोन तर शिरसोली येथून उर्वरित दोघांना अटक
घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, हाणामारी करणारे तरुण पोलिसांच्या हाती लागले नाहीत. हाणामारीच्या घटनेत फायरिंग झाल्याची चर्चा असल्याने पोलिस उपअधीक्षक डॉ. नीलाभ रोहन हे निरीक्षकांसह घटनास्थळी तसेच उस्मानिया पार्क परिसरात रात्री उशिरापर्यंत ठाण मांडून होते. दरम्यान रात्री उशीरापर्यंत शहर पोलीसांची कारवाई करत होते. यातील संशयित आरोपी राजू सपकाळे हा माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा आहे. राजू सपकाळे आणि मिलींद सकट यांना घटनास्थळाहून ९ जुलै रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास अटक केली. त्यांची अधिक चौकशी केली असताना इम्रान आणि मयूर हे शिरसोली येथे असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अरूण निकम यांनी पथक तयार करून शिरसोली येथे रवाना केले. १० जुलै रोजी रात्री २ वाजता शिरसोलीतून संशयित आरोपी मयुर अलोणे आणि इम्रान शहा यांना अटक करून त्यांच्या ताब्यातील दोन गावठी बनावटीचे कट्टे हस्तगत केले. याप्रकरणी शहर पोलीसात चौघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि दिपक बिरारी करत आहे.

यांनी केली कारवाई
विभागीय पोलीस अधिकारी निलाभ रोहन आणि पोलीस निरीक्षक अरूण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ वासुदेव सोनवणे, गणेश शिरसाळे, अक्रम शेख, प्रमेश ठाकूर, सुधीर सावळे, सचिन वाघ, रतन गिते, विजय निकुंभ, भास्कर ठाकरे, गणेश पाटील, महेंद्र पाटील, निलेश पाटील, सुनिल वाणी, योगेश इंधाटे, तेजस मराठे यांनी कारवाई केली.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2774423882662366/

Protected Content