हवामान विमा योजनेत केळीची वादळ व गारपीट भरपाई तातडीने द्या

 

जळगाव. : प्रतिनिधी । हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन २०१९-२० अंतर्गत केळीचा विमा शेतक-यांनी काढलेला असून नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ शेतक-यांच्या बँक खात्यात वर्ग करा अशी मागणी खासदार उन्मेष पाटील यांनी कृषी आयुक्तांकडे केली आहे

विमा कंपनीने ७ ऑक्टोबरपासून शेतक-यांना केळी पिक विमा मधील तापमानाची रक्कम (कमाल व किमान तापमानाची) रक्कम वर्ग केलेली आहे. परंतु जळगाव जिल्हयात झालेल्या वादळी पाऊस व गारपीटमुळे शेतक-यांचे नुकसान झाले होते. शेतक-यांना वादळ व गारपीटीने झालेल्या नुकसानाकरीता देखील विमा सरंक्षण लागु आहे.परंतु वादळ व गारपीटीने पिकाचे झालेल्या नुकसानीच्या भरपाईची रक्कम अद्यापही शेतकयांना मिळालेली नाही. तातडीने कार्यवाही करीत भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आयुक्तांकडे केली आहे.

शेतक-यांना १२ टक्के विलंब शुल्कासहित नुकसान भरपाई देण्याबाबत कंपनीस आदेशीत करावे. अशी आग्रही मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी कृषी आयुक्त पुणे यांच्या कडे केली आहे.

Protected Content