हरीविठ्ठल नगरात मध्यरात्री दुचाकीला आग; रामानंदनगर पोलीसात नोंद

जळगाव प्रतिनिधी । शहरातील हरीविठ्ठल नगरात दुचाकीला मध्यरात्री अचानक आग लागल्याने दुचाकीचे नुकसान झाल्याची घटना उघडकीला आली आहे. आग नेमकी कश्यामुळे लागली हे स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, शिवाजी मुरलीधर बारी (वय-४८) रा. हरीविठ्ठल नगर हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. त्यांच्याकडे (एमएच १९ बीपी ३८२३) क्रमांकाची दुचाकी आहे. २ नोव्हेबर रोजीच्या मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास सर्व झोपलेले असतांना अंगणात पार्किंग करून लावलेल्या दुचाकीने अचानक पेट घेतला. या आगीत गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी शिवाजी बारी यांनी रामानंद नगर पोलीसांना माहिती दिली. शिवाजी बारी यांच्या खबरीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक जितेंद्र तावडे करीत आहे.

Protected Content