जळगाव प्रतिनिधी । हरीविठ्ठल नगरातील बसस्थानकाजवळील एका पत्र्याच्या शेडमधील जुगार अड्डा रामानंद नगर पोलीसांनी उधळून लावला होता. जगार खेळणाऱ्यांसोबत रामानंद नगर पाच पोलीस कर्मचारी तडजोडी करत असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षकांना मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांची चांगली झाडाझडती घेतली असून याबाबत पाचही जणांकडून याबाबतचा खुलासा मागविला असल्याने पोलीस दलात एक खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, हरिविठ्ठल नगर स्टॉपवर एका पत्र्याच्या शेडमध्ये पाच जुगाराचा खेळ खेळत असल्याची माहिती रामानंदनगर पोलिसांना मिळाल्यानुसार पोलीस कर्मचारी उमेश पवार, विनोद सोनवणे, अल्ताफ पठाण, निलेश दंडगव्हाण, चंद्रकांत पाटील या कर्मचार्यांचे पथकाने माहितीनुसार रविवारी दुपारी ४ वाजेच्या जुगार अड्डयावर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी ३ हजार ६०० रुपये रोख, तीन मोबाईल व एक दुचाकी असा २१ हजार १५० रुपयांचा माल जप्त केला. तसेच जुगार खेळणार्या विजय अशोक मोरे, अकबर पटेल, विकास शिवराम दुबळकर, गणेश पांडुरंग कापडे, गणेश राजू वाघ सर्व रा. हरिविठ्ठल नगर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ताब्यात घेण्यात आले. दरम्यान जुगाराच्या कारवाईत पोलीस कर्मचाऱ्यांनी जुगार खेळणार्यांसोबत तडतोड करण्याचा प्रयत्न केला. तडतोड म्हणून काही पैसेही मागतिले. हा प्रकार यातील एकाने थेट अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांना मोबाईलवरुन फोन केला व सदरचा प्रकार कळविला. जुगारावर कारवाई करुन तडजोडीच्या प्रकाराची गंभीर दखल घेत भाग्यश्री नवटके यांनी तत्काळ रामानंदनगर पोलीस ठाणे गाठले. याठिकाणी स्वतंत्रणपणे पाचही कर्मचार्यांची झाडाझडती केली. याप्रकरणी अपर पोलीस अधिक्षकांनी संबंधित पोलीसांनी याप्रकाराबाबत खुलासा मागविला आहे.