यावल प्रतिनिधी । माजी खासदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीभाऊ जावळे यांच्या मातोश्री सुमन माधव जावळे यांनी प्रपंचाचा त्याग करून महानुभाव पंथाची संन्यास दीक्षा घेतली आहे. यानिमित्त रविवारी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
तालुक्यातील भालोद येथे रविवारी संन्यास दीक्षा विधी महोत्सव धार्मिक विधीवत पद्धतीने उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात जिल्ह्यातील महानुभाव पंथातील संत-महंत उपस्थित होते. या सोबत माजी मंत्री एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार शिरीष चौधरी, प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्यासह राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दिली.