रावेर प्रतिनिधी । भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार हरीभाऊ जावळे यांना जीवे ठार मारण्याच्या आलेल्या धमकीचा येथील भाजपतर्फे निषेध करण्यात आला आहे.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार हरिभाऊ जावळे यांना ३३ दिवसानंतर खुन करण्याची धमकी जळगाव येथील राजेंद्र आर पवार या इसमाने मोबाईल ने संदेश पाठवून दिल्याने त्याचा रावेर तालुका भाजपा तर्फ जाहीर निषेध करण्यात येवून त्याचे वर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या संदर्भात रावेर तहसिलदार उषाराणी देवगुणे , फैजपुर उपनिभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांना रावेर तालुका भाजपा कडून निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष पदमाकर महाजन, तालुका अध्यक्ष राजन लासुरकर , सरचिटणिस चुडामण पाटिल, उपाध्यक्ष वासुदेव नरवाडे, दिलीप पाटिल यांची उपस्थिती होती.