आदिवासी कुटुंबांना मदतीचा हात

यावल प्रतिनिधी । लॉकडाऊनच्या कालावधी उपासमार होत असलेल्या आदिवासी कुटुंबांना सचिन जगताप आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मदतीचा हात दिला आहे.

यावल प्रतिनिधी तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या नागदेवी या आदिवासी पाड्यावर जाऊन कोरोना संचारबंदी च्या पार्श्‍वभूमीवर सध्या राज्यात हातावर पोट भरणार्‍या गोरगरिबांची अवस्था फारच बिकट झाली आहे. या संकटसमयी अनेक नागरिकांनी विविध मार्गाने मदतीसाठी आपले हात पुढे केले असेल अशाच प्रकारे यावरच्या तहसील अंतर्गत येणार्‍या किनगाव विभागाचे मंडळ अधिकारी सचिन जगताप यांनीदेखील गोरगरीब आदिवासींच्या मदतीसाठी आपले हात पुढे केला आहे. त्यांनी तालुक्यातील नागदेवी या आदिवासी पाड्यावर जाऊन सुमारे ३० आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक गहू तांदूळ तेल मिरची पावडर मीठ हळद इत्यादी वस्तूंचे वाटप यावल चे तहसीलदार जितेन्द्र कुवर यांच्या हस्ते वाटप केले.

याप्रसंगी दहिगाव चे तलाठी विलास नागरे, किनगाव येथील तलाठी पी. एल. पाटील, मालोदचे तलाठी टी. सी. बारेला, कोतवाल गणेश वराडे, जहांगिर तडवी, विजय साळवे, ज्ञानेश्‍वर कोळी आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी मंडळ अधिकारी सचिन जगताप यांनी अशा संकटसमयी स्वखर्चाने केलेल्या सहकार्याबद्दल आदिवासी बांधवांनी त्यांचे कौतुक करून आभार मानले.

Protected Content