मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा गावाला लागून असलेल्या एका शेतातून शेतकऱ्याचे १ लाख १५ हजार रूपये किंमतच्या दोन म्हशी चोरट्याने चोरून नेले. याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुक्ताईनगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, धनराज श्रीराम शेळके (वय-५१) रा. हरताळा ता. मुक्ताईनगर यांचे गावाच्या जवळ असलेले शेत गट नंबर ६८३ शेत आहे. या शेतात त्यांनी म्हशी बांधलेल्या असतात. ७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी १ लाख १५ हजार रुपये किमतीच्या दोन म्हशी मध्यरात्री छोटा हत्ती वाहनातून चोरून नेले. हा प्रकार त्यांना पहाटे ४ वाजता समोर आला. त्यांनी म्हशींचा सर्वत्र शोध घेतला, परंतु त्यांना कुठेही काहीही माहिती मिळाली नाही. अखेर दुपारी २.३० वाजता त्यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस नाईक विजय पढारे करीत आहे.