मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – राज्यातील साडेसाती निघून जावी यासाठी खा. नवनीत राणा आणि आ. रवि राणा यांनी मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवास्थानासमोर हनुमान चालीसा पठन करणार याचा निर्धार करीत मुंबईत पोचले आहेत. तर राणा दाम्पत्याला खेरवाडी पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे.
खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठन करण्याचा संकल्प केला, यावर प्रत्त्युत्तर म्हणून मुंबईत येऊन दाखवा असे आवाहन शिवसेनेकडून देण्यात आले होते. त्यानुसार आमदार आणि खासदार राणा दाम्पत्य मुंबईत पोचले असून उद्या सकाळी मातोश्री समोर पोहचणार असल्याची ठाम भूमिका या राणा दाम्पत्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
आम्ही कोणतेही शस्त्र घेऊन मातोश्री परिसरात जात नसून हनुमान चालीसा पठन करणार आहोत. हनुमान चालीसा पठन करण्यास विरोध का? असा प्रश्न खा. राणा यांनी विचारला असून करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असे खा. नवनीत राणा यांनी म्हटले आहे.
दरम्यान आमदार आणि खासदार राणा दाम्पत्य मुंबईत पोचले असून त्यांना कायदा-सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे खेरवाडी पोलिसांकडून सांगण्यात आले असून त्यांना पोलिसांनी कलम १४९ अंतर्गत नोटीस बजावली आहे.