हनुमान चालीसा पठण करणे गुन्हा असेल तर आम्हाला फाशी द्या !; राणा दाम्पत्याचा हल्लाबोल

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यज वृत्तसेवा । गेल्या काही दिवसांपासून हनुमान चालीसावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. खार पोलीसांनी राणा दाम्पत्याला अटक केली. दरम्यान हनुमान चालीसा पठण करणे गुन्हा असेल तर आम्हाला फाशी द्या असा संतप्त सवाल नवनीत राणा यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे.

 

मागील काही दिवसांपासून हनुमान चालीसावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. ‘मातोश्री’वर हनुमान चालिसा पठण करण्याची भूमिका राणा दाम्पत्याने घेतली होती. मात्र गदारोळ झाल्यानंतर त्यांनी आपली भूमिका मागे घेतली. परंतु या वादावर पडदा न पडता त्यांच्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली आणि त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला.  खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना वांद्रे न्यायालयानं हजर केले असताना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकारानंतर खासदार नवनीत राणा यांनी ट्विट करत हल्लाबोल केला आहे. हनुमान चालीसा पठण करणे गुन्हा असेल तर आम्हाला फाशी द्या, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

 

हनुमान चालीसा वाचणे पाप आहे का? कलम 124 (अ) अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा लावा. देशातील जनतेला आमचा प्रश्न आहे की हनुमान चालीसा पठण करणे गुन्हा आहे. असेल तर आम्हाला फाशी द्या, असे खासदार नवनीत राणा यांनी ट्विट केलेय. तर अन्य एका ट्विटमध्ये नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. उद्धव ठाकरे  यांच्या दबावाखाली पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अटक  केल्या प्रकरणी सांताक्रुज पोलीस स्टेशन च्या कोठडीत रात्रभर  101 वेळा हनुमान चालीसाचे पठण केले, असे ट्विट राणा यांनी केले आहे.

Protected Content