जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेले हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे आज सकाळी नऊ वाजता धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असल्याचे सूत्रांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ च्या बोलताना सांगितले.
धरणातून ५५१० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याबरोबरच मोर, वाघूर, बहुळा, सुकी धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. हतनूर धरणाच्या परिसरातील गावांमध्ये दोन दिवसांपासून पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील हतनूर धरण हे मोठे मानले जाते. मध्यप्रदेशाच्या सीमेवरही काल जोरदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे धरणाच्या पातळीत वाढ होतानाचे चित्र आहे.