हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडलेले ढोलाविरा आता जागतिक वारसा

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडलेले भारतातील ढोलविरा शहराची जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नोंद करण्यात आली आहे.

 

संयुक्त राष्ट्रांच्या सांस्कृतिक विभागाने ही  घोषणा केली. युनेस्कोनं आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून घोषणी केली आहे. ढोलविरा शहराचा भारतीय पुरातत्व विभागाने १९६७-६८ मध्ये शोध लावला होता. जगातील सर्वात प्राचीन शहर म्हणून याची नोंद आहे.

 

गुजरातमधील सागरी किनाऱ्यावर वसलेलं ढोलविरा हे हडप्पाकालीन शहर आहे. या शहराला हडप्पन संस्कृतीचा वारसा आहे. ढोलविरातील शहरी वस्ती १५०० वर्षांच्या काळात उभी राहिली. तेथील वसाहतींमध्ये मध्य शहर, किल्ले, सखल शहर असे भाग दिसतात. तेथे १४-१८ मीटर जाडीची भिंत असून ती संरक्षणात्मक उपाय म्हणून बांधलेली आहे. ऐतिहासिक काळात इतक्या जाडीच्या भिंती दिसत नाहीत, अगदी घातक शस्त्रांच्या वापर काळातही अशा भिंती नव्हत्या. आतापर्यंतच्या संशोधनानुसार या भागात मोठय़ा त्सुनामी नवीन नाहीत. ढोलविराची रूंद भिंतही त्सुनामीपासून रक्षणासाठी बांधलेली होती. त्या काळातही सागरी आपत्ती व्यवस्थापन केले जात होते, असं अभ्यासातून पुढे आलं आहे.

 

दुसरीकडे तेलंगण राज्यातील वारंगलजवळील पालमपेट, मुलुगु जिल्ह्यात रुद्रेश्वराच्या मंदिराचे नाव (रामप्पा मंदिर म्हणून ओळखले जाणारे) युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये कोरले गेले आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या ४४ व्या अधिवेशनात २५ जुलै रोजी हा निर्णय घेण्यात आला.

 

Protected Content